महाराष्ट्र : माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड बनले माळेगाव कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक मंडळाचा धोरणात्मक निर्णय

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. २८) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या धोरणात्मक निर्णयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. बैठकीस उपाध्यक्ष संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, गायकवाड यांच्या मार्गदर्शनामुळे कारखान्याची कार्यपद्धती अधिक सुधारून सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणे शक्य होईल. दरम्यान, कारखान्याने ऊस लागवडीला चालना देण्यासाठी आणि शेतीपूरक उपक्रमांना बळ देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन २०० रुपयांचे “कांडे पेमेंट” वर्ग केले आहे. या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, उपाध्यक्षा संगीता कोकरे आणि संचालक मंडळाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेतकरीहिताच्या निर्णयांचे स्वागत केले.

ChiniMandi WhatsApp Channel

शेखर गायकवाड यांच्या बाबतीत थोडेसे…

शेखर गायकवाड हे महाराष्ट्र शासनातील निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी असून त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केले आहे. साखर उद्योग, सहकार आणि स्थानिक स्वराज्य प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली जाते. महाराष्ट्र शासनाचे साखर आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पुणे महानगरपालिकाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. प्रशासकीय सेवेत त्यांनी सुमारे ३६ वर्षे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. साखर उद्योगातील पारदर्शकता, शेतकरीहित आणि नियोजनबद्ध प्रशासनावर त्यांनी भर दिला.ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि शासन यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न केले. इथेनॉल, साखर उद्योगाचे आधुनिकीकरण आणि ऊस अर्थव्यवस्थेवरील विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here