महाराष्ट्र : राज्यातील साखर उत्पादन तब्बल १२ टक्क्यांनी घटण्याचा ‘इस्मा’चा अंदाज

मुंबई : यंदा ऊस उत्पादक राज्यांमध्ये पिकाची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा फटका ऊस पिकाला बसला आहे. तर काही राज्यांमध्ये कमी पावसामुळे पिकाला पाणी टंचाई आणि उष्णतेचा सामना करावा लागला. त्यामुळे साखर उत्पादनातही काही राज्यांमध्ये वाढ आणि काही राज्यांमध्ये घट दिसून आली आहे. परिणामी देशात यंदा ५५ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. गेल्यावर्षीच्या तुलनेत गाळपासाठी उपलब्ध ऊस क्षेत्र यंदा ३ टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्राला दुष्काळाचा फटका जास्त बसला आहे. राज्यात यंदा उपलब्ध ऊस क्षेत्र १० टक्क्यांनी तर साखर उत्पादनात सर्वाधिक १२ टक्के घटेल, असा अंदाज इंडियन शुगर ॲण्ड बायो-एनर्जी मॅन्यूफॅक्चर्रस असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.

‘इस्मा’च्या मते, महाराष्ट्रा साखर उत्पादन ८७ लाख टनांवर स्थिरावेल. देशात गेल्या हंगामात देशात २८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाचे साखर उत्पादन २६५ लाख टनांवर स्थिरावेल. म्हणजेच उत्पादनात ५ टक्के घट येईल, असा इस्माचा अंदाज आहे. कर्नाटकातील उत्पादन ७ टक्के तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील उत्पादनात १ टक्का घट येण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये उत्पादनात काहीशी वाढ होऊ शकते. देशात गेल्या हंगामात इथेनाॅल निर्मितीसाठी ३२ लाख टन साखरेचा वापर झाला होता. त्यामुळे २८० लाख टन साखरेसह एकूण ३१२ लाख टन उत्पादन झाले होते. केंद्र सरकारने यंदा उसाचा रस आणि साखरेपासून इथेनाॅल निर्मितीवर बंदी घातली आहे. परिणामी साखर इथेनाॅलकडे जाणार नाही आणि २६५ लाख टन उत्पादन असेल, असेही असेही ‘इस्मा’ने स्पष्ट केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here