बीड : ओंकार साखर कारखान्याच्या युनिट क्र. ८, पांगरीच्यावतीने चालू गळीत हंगाम २०२६-२७साठी ३३५० ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याच्यावतीने पहिला हप्ता ३२०० रुपये आणि दिवाळी हप्ता १५० रुपये असे प्रतिटन ३३५० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहेत. उसाला सर्वाधिक दर देणारा ओंकार साखर कारखाना बीड जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. या घोषणेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांकडून जाहीर होणारे ऊसदर हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि शेतीच्या वाढत्या खर्चाचा विचार करता ऊसदराकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देऊन ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्याच्या दृष्टीने ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


















