महाराष्ट्र : गूळ उद्योग नियमावलीचा १५ दिवसांत मसुदा सादर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश

मुंबई : राज्यातील मोठ्या गूळ व खांडसारी प्रकल्पांकरिता राज्य शासनाची नियमन प्रणाली असणे आवश्यक आहे. यासाठीची नियमावली तयार करावी, त्याचा मसुदा येत्या पंधरा दिवसांत सादर करावा, असेही आदेश बैठकीत देण्यात आले. विधानभवनात साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या आर्थिक साहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठित केली आहे. गठित समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष प्रताप ओहोळ, सर्वश्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, डॉ. विनय कोरे, राजेश टोपे, विक्रम काळे, अभिमन्यू पवार, अभिषेक पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, साखर संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here