महाराष्ट्र : गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यांची लगबग, हंगामावर आंदोलनाचे सावट

सोलापूर : राज्य सरकारने मंजुरी दिल्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू व्हावा यासाठी साखर कारखानदारांकडून जोरदार तयारी सुरू आहे. बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाण व मोळी पूजन करून अनेक ठिकाणी हंगाम सुरू करण्यात आला आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्स्वभूमीवर उसाची चांगली वाढ झालेली नाही. राज्यात यंदाच्या हंगामात १५ लाख हेक्टर इतके उसाचे क्षेत्र आहे. गळीत हंगामात सहभागी होण्यासाठी २१० साखर कारखान्यांनी परवानगी घेतली आहे. राज्याचे सरासरी हेक्टरी ऊस उत्पादन ८२ मेट्रिक टन असून संभाव्य साखर उतारा १०.५० टक्के असेल अशी शक्यता आहे.

दरम्यान, ऊस दरासाठी आणि साखर कारखाने उशिरा सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची तीव्रता आणि एकजुटीवर हंगामाला गती कधी येईल हे अवलंबून असेल. दुष्काळामुळे उसाची वाढ खुंटल्याने लवकर गाळप केल्यास साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. यंदा पावसाअभावी उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे लवकर गाळप सुरू केल्यास अपरिपक्व ऊस तोडावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि कारखान्यांचा साखर उतारा या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे विविध शेतकरी संघटनांनी हंगाम लवकर सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here