इथेनॉलसाठी मक्याचा सर्वाधिक वापर मात्र शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नसल्याचा आक्षेप, दरनिर्धारणांची मागणी

नाशिक : देशात सध्या ऊसाच्या उप उत्पादनांपासून (सी-हेवी, बी-हेवी मोलॅसिस, ऊसाचा रस व सिरप) तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर निश्चित करताना ऊसाच्या एफआरपीला आधार मानून कच्चा माल, प्रक्रिया, ऊर्जा, घसारा, वित्तीय खर्च आणि वाजवी नफा या घटकांचा विचार केला जातो. मात्र, मका-आधारित इथेनॉलच्या बाबतीत शासन नेमका कोणता मका दर गृहीत धरते, याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. देशात २०२४-२५ मध्ये इथेनॉल निर्मितीसाठी वापरलेल्या कच्च्या मालात मक्याचा वाटा सुमारे ४५ ते ४६.५ टक्के असून, इथेनॉल निर्मितीसाठी सर्वाधिक वापरला जाणारा कच्चा माल म्हणून मक्याने ऊसालाही मागे टाकले आहे. मात्र, याचा अपेक्षित आर्थिक लाभ मका उत्पादकांना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनाशी सुसंगत दर करावा, अशी मागणी केली जात असल्याचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने दिले आहे.

दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध वृत्तात म्हटले आहे कि, देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला वेग देण्यासाठी मका हा प्रमुख कच्चा माल म्हणून पुढे आला आहे. मात्र, मागील खरीप हंगामानंतर मक्याला केवळ १६०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मक्याची इथेनॉल उद्योगासाठी मागणी वाढली असली, तरी तसा बाजारभाव दिसून येत नाही. त्यामुळे इथेनॉलचा खरेदी दर निश्चित करताना मक्याचा किमान आधारभूत दर (एमएसपी), बाजारभाव किंवा अन्य कोणता निकष वापरला जातो, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आहे. मका-आधारित इथेनॉलचा दर ७१.८६ रुपये प्रतिलिटर निश्चित केला असल्यास, त्या दरामागे मक्याची कोणती किंमत (उदा. एमएसपी २४८० रुपये प्रतिक्विंटल किंवा अन्य) गृहीत धरली आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी आहे. मका-आधारित इथेनॉलसाठी कोणती किंमत गृहीत धरली, प्रति मेट्रिक टन मक्यापासून किती लिटर इथेनॉल उत्पादन गृहीत धरले, प्रक्रिया खर्च, घसारा, वित्तीय खर्च, उद्योगासाठी गृहीत नफा किती यांसह इथेनॉल दरनिर्धारणाचे संपूर्ण खर्चपत्रक सार्वजनिक करावे, अशी मागणी केली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here