नंदुरबार : दिवाळीनिमित्त २५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील ‘ओंकार’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप – चेअरमन बाबुराव बोत्रे -पाटील

नंदुरबार : परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध राहत गतवर्षीच्या हंगामासाठी प्रतिटन तीन हजार ५० रुपये असा जिल्ह्यातील उच्चांकी भाव देण्यात आला असून, दिवाळीनिमित्त २५ ऑक्टोबरपासून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप सुरू केले जाईल. त्याचप्रमाणे यंदाच्या हंगामातही जिल्ह्यात सर्वाधिक दर ऑकार कारखान्यातर्फे देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी केले. तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे ओंकार साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदीपन मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

शेतकरी हा कारखान्याचा कणा

ChiniMandi WhatsApp Channel

दीपक पाटील म्हणाले की, ज्या सभासदांनी कारखान्याकडे ठेवी ठेवल्या आहेत तसेच ज्यांचे कारखान्याकडे घेणे बाकी आहे अशा सर्वांना त्यांची रक्कम १०० टक्के अदा केली जाईल. शेतकरी हा कारखान्याचा कणा असून कारखान्याची चाके चालली तर परिसरात विकासाची गंगा येईल. सर्व समस्या अडचणींवर मात करून कारखान्याची वाटचाल सुरू आहे, असे सांगितले. कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपूर्वीच १०० टक्के अंमलबजावणीसह २० टक्के पगारवाढ लागू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. प्रास्ताविकात युनिट हेड अशोक पाटील यांनी कारखाना परिक्षेत्रात सुमारे सात लाख मेट्रिक टन उसाची नोंद असून दररोज सुमारे सहा हजार मेट्रिक टन याप्रमाणे यंदा विक्रमी संख्येने ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगितले.

तीन ते चार महिन्यात उपप्रकल्पही होणार सुरु

चेअरमन बोत्रे-पाटील म्हणाले की, गत हंगामात शेतकऱ्यांना दोन हजार ९५० रुपये दर अदा करण्यात आला होता. त्यात दिवाळीनिमित्त प्रतिटन १०० रुपयांची भर घालून २५ तारखेनंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, ज्यामुळे एकूण भाव ३ हजार ५० रुपयांवर पोहोचेल. याव्यतिरिक्त दिवाळीनिमित्त प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोफत साखर वाटप २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. तसेच बंद असलेला जुना सातपुडा कारखाना व उपपदार्थ प्रकल्प पुढील तीन ते चार महिन्यांत सुमारे १० कोटी रुपये खर्च करून पुन्हा कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here