ऊर्जा विकास आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जैवइंधन अत्यंत महत्त्वाचे: मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऊर्जा विकास आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जैवइंधनांचे जोरदार समर्थन केले आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (PHDCCI) ऊर्जा सुरक्षा आणि हवामान बदल कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारतासाठी बायोएनर्जीच्या भूमिकेवर सेंटर फॉर कॉमर्स अँड इंडस्ट्री समिटमध्ये बोलताना मंत्री गडकरी म्हणाले कि, आपण इंधन आयातदार ऐवजी निर्यातदार बनण्यासाठी धोरणात्मक बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे.

गडकरींनी इथेनॉल उत्पादनासाठी तुटलेले तांदूळ आणि ऊस यांसारख्या अतिरिक्त उत्पादनांचा वापर करण्याची क्षमता अधोरेखित केली. उसाचे पाचट जाळण्याच्या समस्येवर बोलताना त्यांनी शेतकर्‍यांना पिकांच्या अवशेषांची विक्री करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रस्ताव दिला. ज्यामुळे ग्रामीण, कृषी आणि आदिवासी भागाची आर्थिक प्रगती होईल .गडकरींनी शाश्वत विमान इंधनाचा पुरस्कार केला, भारतातील बायो एव्हिएशन फ्युएलमध्ये 2 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठ्या गुंतवणुकीच्या क्षमतेबद्दल आशावाद व्यक्त केला.

पीएचडीसीसीआयचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांनी गडकरींच्या दूरदृष्टीचे आणि देशातील गुणात्मक, वेळेवर, किफायतशीर आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वचनबद्धतेचे कौतुक केले. अग्रवाल म्हणाले, अक्षय ऊर्जेव्यतिरिक्त गडकरी यांच्या देखरेखीखाली गेल्या 7 वर्षात 70,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले असून सध्या 3,00,000 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधले जात आहेत. ते म्हणाले, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारने देशात जैव उर्जेला चालना देण्यासाठी अनेक धोरणे आणि कार्यक्रम सुरू केले आहेत.

हेमंत जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष, PHDCCI, यांनी हरित आणि स्वच्छ उर्जेच्या स्त्रोतांकडे वळल्याबद्दल कौतुक केले आणि इंधनाचे भविष्य म्हणून ग्रीन हायड्रोजन आणि जैव इंधनाचा अवलंब करण्यावर भर दिला. PHDCCI चे तत्कालिन माजी अध्यक्ष साकेत दालमिया यांनी उद्योगासमोरील आव्हानांवर चर्चा केली आणि गडकरींकडून मदत मागितली.पर्यावरण आणि हवामान बदल समितीचे अध्यक्ष डॉ. जे.पी. गुप्ता यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या मुख्य उद्दिष्टाच्या अनुषंगाने ऊर्जा सुरक्षा आणि रोजगाराला चालना देण्यासाठी जैवइंधनाची निकड अधोरेखित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here