21 ऑगस्टला सहा ठिकाणी करणार भाकियू कार्यकर्ते धरणे आंदोलन

105

सहारनपूर : व्याजासहित ऊस थकबाकीच्या मागणीसाठी भारतीय किसान यूनियन 21 ऑगस्टला जिल्ह्यातील सहा ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. भाकियू पदाधिकार्‍यांनी सरकारवर शेतकर्‍यांची उपेक्षा करण्याचा आरोपही केला आहे. भारतीय किसान यूनियन चे जिल्हा महासचिव अशोक कुमार यांनी सांगितले की, प्रदेश उपाध्यक्ष चौधऱी विनय कुमार यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होणार आहे. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये जवळपास 625 करोड रुपये साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे देय आहे. जिल्हा महासचिव यांनी सांगितले की, 21 ऑगस्ट ला साखर कारखान्यांशी संबंधित सहा ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येईल. यामध्ये गागलहेडी थान्यावर प्रदेश उपाध्यक्ष चौ. विनयम कुमार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होईल. सरसावा मध्ये ब्लाक अध्यक्ष सरदार भोला सिंह यांच्या नेतृतवाखाली तर देवबंद थान्यावर होणार्‍या आंदोलनाचे नेतृत्व तहसील अध्यक्ष ईश्‍वर चंद आर्य आणि ब्लॉक अध्यक्ष विनय करतील. नानौता थान्यावर प्रदेश सचिव अमीर हैदर जैदी तसेच जिल्हा उपाध्यक्ष चौधरी जगपाल सिंह यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होईल. उत्तम शुगर मिल शेरमउ साठी गंगोह थान्यावर धरणे आंदेालन जिल्हा महासचिव चौधरी अशोक कुमार, तहसील अध्यक्ष चौधऱी देशपाल, ब्लाक अध्यक्ष बूजपाल सैनी करतील. त्यांनी कार्यकर्त्यांना धरणे आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन करताना सांगितले की, या ठिकाणी होणार्‍या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here