परभणी : दराडे आडगाव (ता. सेलू) येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याच्या चेअरमन भावना मुंगसे-बोर्डीकर यांनी नव्या गळीत हंगामाच्या प्रारंभीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिटन ३,००० रुपये एकरकमी भाव जाहीर केला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर या गळीत हंगामात उत्पादित करण्यात आलेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला चेअरमन भावना मुंगसे-बोर्डीकर, सचिन मुंगसे, भाजपचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, युवा उपजिल्हाध्यक्ष विनोद शेरे, कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक ताठे, उपतालुकाध्यक्ष नामदेव आवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याची भरभराट व्हावी, यंदाच्या हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, अशी प्रार्थना यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी करण्यात आली. दसऱ्याच्या मुहूर्तावर आयोजित कार्यक्रमावेळी शेतकरी आणि साखर कारखाना यांच्यातील परस्पर सहकार्य अधिक दृढ होऊन आगामी काळात परिसरातील ऊस उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण होते. एकरकमी दर जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नव्या हंगामातील आर्थिक नियोजन, ऊस उत्पादनाबाबतच्या अपेक्षांना महत्त्व प्राप्त झाले. नव्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, अशी मनोकामना करण्यात आली.



















तिनं.हजारने.ऊस.घेतल्यावर.भरभराट.होणारच.कारखाने.तोटा.होऊ.देणारच.नाहित.फक्त.शेतकऱ्यांचाच.तोटा.होणार