नाबार्ड-आयएमडीच यांच्यात भागीदारी; स्थानिक हवामानाचा अंदाज थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली: भारतातील हवामान-सक्षम शेतीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलताना राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) यांनी भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष वेळेतील आणि अत्यंत स्थानिक पातळीवरील हवामानविषयक अपडेट्स डेटा इन क्लायमेट रेजिलिएंट अॅग्रीकल्चर (DiCRA) या प्लॅटफॉर्मवर थेट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ‘रुरल व्हॉइस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (UNDP) सहकार्याने या ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन केले जाते.

या भागीदारीचा मुख्य उद्देश हवामानविषयक माहिती मिळवण्यातील अडथळे दूर करणे आणि कच्च्या हवामानविषयक आकडेवारीचे शेतकरी, वित्तीय संस्था आणि स्थानिक प्रशासनाला प्रत्यक्ष उपयोगी पडेल अशा सोप्या मार्गदर्शनात रूपांतर करणे हा आहे. ‘नाबार्ड’चे संजीव डी. रोहिल्ला आणि मुंबईतील ‘आयएमडी’च्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे प्रतिनिधी बिक्रम सिंह यांनी या कराराला अंतिम स्वरूप दिले. यावेळी ‘नाबार्ड’चे अध्यक्ष शाजी कृष्णन व्ही. आणि ‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

या करारानुसार आयएमडीकडून जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील हवामान अंदाज, शेतीसाठी विशेष हवामानविषयक सल्ले, प्रत्यक्ष ठिकाणांवरील हवामान निरीक्षणे तसेच तीव्र हवामानाच्या इशाऱ्यांची माहिती थेट DiCRA प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही माहिती DiCRA वरील स्वतंत्र हवामान विभागात उपलब्ध असेल. मातीतील ओलावा, पिके व वनस्पतींची स्थिती, पिकांचे आरोग्य आणि पर्यावरणीय जोखमींचे मोजमाप करणाऱ्या विद्यमान भौगोलिक माहिती प्रणालीशी ही माहिती जोडली जाणार आहे.

शेतकरी आणि वित्तीय संस्थांना थेट फायदा

जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी नाबार्ड हे नवीन हवामानविषयक डेटासेट DiCRA च्या ओपन API प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणार आहे.DiCRA ची वेबसाइट, मोबाइल इंटरफेस किंवा बाह्य सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकरी, क्षेत्रीय कर्मचारी, कर्ज अधिकारी आणि इतर वापरकर्त्यांना जिल्हानिहाय हवामान इशारे, हंगामी जोखमींची माहिती आणि जोखीम विश्लेषण सहज उपलब्ध होणार आहे.या व्यवस्थेअंतर्गत नाबार्ड DiCRA प्लॅटफॉर्ममध्ये स्वतंत्र हवामान पोर्टल विकसित करत आहे.वेळेवर हवामान माहितीमुळे शेतीविषयक निर्णय अधिक प्रभावी होणारकृषी आणि आर्थिक जोखमींचे व्यवस्थापन करताना वेळेवर मिळणाऱ्या हवामानविषयक माहितीचे महत्त्व दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

‘नाबार्ड’चे अध्यक्ष शाजी कृष्णन यांनी सांगितले की, पर्यावरणीय घटकांचा कृषी कर्जवाटप आणि विकासाच्या धोरणांमध्ये थेट समावेश केला पाहिजे. ‘आयएमडी’ची हवामान अंदाजाची क्षमता आणि नाबार्डची ग्रामीण भागातील पोहोच एकत्र आल्यामुळे शेतकरी तसेच वित्तीय संस्थांना संभाव्य जोखमींची पूर्वकल्पना मिळू शकते.

दरम्यान, ‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत देशातील हवामान अंदाजाच्या अचूकतेत ५० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे. आता ही माहिती स्थानिक ग्रामपंचायत पातळीपर्यंत पोहोचवली जात आहे.मात्र, प्रत्येक ग्रामीण शेतकऱ्याला आवश्यक वेळी प्रत्यक्ष कृती करता येईल अशी हवामानविषयक अचूक माहिती उपलब्ध करून देणे, हे आता सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here