ऊस थकबाकी व्याजासहीत देण्याची मागणी

79

चंदीगड: आम आदमी पार्टी (आप) च्या पंजाब शाखेने मागणी केली आहे की, पंजाबात सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांकडून दोन वर्षापासून अधिक काळ प्रलंबित असणारी ऊस थकबाकी शेतकऱ्यांना व्याजासहित द्यावी. पक्षाने इशारा दिला आहे की, जर कारखानदारांनी ही थकबाकी १० दिवसांच्या आत भागवली नाही तर पक्षाला राज्यव्यापी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते हरपाल सिंह चीमा, गढ़शंकर चे आमदार जय कृष्ण सिंह राउरी यांनी सांगितले की, 750 करोड़ रुपये पेक्षा अधिक पैसे देय आहेत. चीमा म्हणाले की, कारखानदार अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यास नकार देत आहेत. आमदार जय कृष्ण सिंह राउरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे सरकारने तीन महिन्यांपासून बँक कर्ज वसुली करणे टाळले आहे. पण तरीही जेव्हा शेतकरी पुढच्या पीकासाठी कर्ज घेण्यासाठी बँकांशी संपर्क करतात तेव्हा त्यांच्यावर आधीचे कर्ज भागवण्याबाबत दबाव टाकला जातो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here