स्वित्झर्लंडमधील प्रस्तावित अमेरिका-इराण चर्चा स्थगित; स्विस परराष्ट्र मंत्रालयाची पुष्टी

जिनेव्हा : स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पुष्टी केली की, अमेरिका, इराण, कतार आणि पाकिस्तान यांच्यात प्रस्तावित असलेली चर्चा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, भविष्यातही या चर्चांना सहकार्य करण्यासाठी स्वित्झर्लंड तयार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेला ई-मेलद्वारे पाठविलेल्या उत्तरात स्विस परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चर्चेच्या तयारीचे काम सुरू असून सध्या याबाबत अधिक माहिती देणे शक्य नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिका, इराण, कतार आणि पाकिस्तान यांच्यातील नियोजित चर्चा स्थगित करण्यात आली आहे. या चर्चांना सुलभ करण्यासाठी स्वित्झर्लंड तयार आहे. बर्गेनस्टॉक येथे आवश्यक तयारीचे काम सुरू आहे. सध्या यापेक्षा अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही.

जेडी वान्स यांचा स्वित्झर्लंड दौरा रद्द…

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स स्वित्झर्लंडला रवाना होणार नाहीत, कारण तांत्रिक स्तरावरील चर्चेची रूपरेषा अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही.प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन शिष्टमंडळ पूर्णपणे तयार असून संधी मिळताच चर्चेसाठी रवाना होऊ शकते.ते म्हणाले, आगामी तांत्रिक चर्चांची योजना अद्याप पूर्णपणे निश्चित झालेली नाही. याचदरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्त्रायल संरक्षण दलाने (IDF) लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर आणि त्याच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला आहे. आयडीएफच्या तुकड्यांवर रॉकेट आणि स्फोटक ड्रोनद्वारे हल्ले झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीत वाढ…

एका पत्रकार परिषदेत जेडी वान्स यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्ध समाप्तीसाठी शांतता आराखड्यावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर ऊर्जा पुरवठ्याबाबत सकारात्मक संकेत दिसून येत आहेत. त्यांच्या माहितीनुसार, गेल्या दिवशी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून सुमारे 1.25 कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक झाली. संघर्ष सुरू झाल्यानंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे त्यांनी नमूद केले. वान्स यांनी दावा केला की, कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा युद्धपूर्व पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. अमेरिकेत पेट्रोलचे दर प्रति गॅलन 4 डॉलरपेक्षा खाली आले असून तेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे इंधनाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here