कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामातील उत्पादित साखर पोत्यांचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, साखर उत्पादन हा कारखान्याच्या गळीत हंगामातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. साखर पोत्यांचे पूजन हा कारखान्याच्या उत्पादन प्रवासातील आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. शेतकरी, कामगार आणि कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या अथक परिश्रमातून साखर उत्पादनाची प्रक्रिया यशस्वी होत असते.
यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देण्यासोबतच कारखान्याची प्रगती अधिक वेगाने व्हावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















