पुणे : ओंकार उद्योग समूहाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : ओंकार उद्योग समूह व संबंधित साखर कारखान्यांची समाज माध्यमांतून खोटी, दिशाभूल करणारी व मानहानिकारक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी रविराज साबळे-पाटील (रा. भूम, ता. परांडा, जि. धाराशिव) यांच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना (ओंकार शुगर युनिट ११)चे जनरल मॅनेजर रणजीत बापूराव तावरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जनरल मॅनेजर तावरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ एप्रिल रोजी रविराज साबळे पाटील याने समाज माध्यमांवरील खात्यांवरून व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओत त्यांनी ओंकार उद्योग समूह व बाबूराव बोत्रे पाटील यांच्या संदर्भात खोटी, अप्रमाणित, दिशाभूल करणारी व चिथावणीखोर विधाने केली. संबंधित व्हिडिओद्वारे कारखान्यांची प्रतिमा मलिन करुन आर्थिक व सामाजिक नुकसान करण्याचा हेतू असल्याचा आरोपही केला आहे. ओंकार उद्योग समूहाच्या १७ युनिटबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून जनमानसात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here