पुणे : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत चुरस वाढली, बंडखोरांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पॅनलसमोर आव्हान

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी झाल्या. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनल तयार केले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने शिवसेना (शिंदे गट) ला एक जागा देत सोबत घेतले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही निवडणूक लढवित आहे. तिरंगी लढतीत सूज्ञ सभासद जुन्या पायवाटेवरून जाणार की परिवर्तनाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे गेल्या १२ वर्षांपासून पुरूषोत्तम जगताप यांच्याकडे होती. त्यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, जगताप यांच्यापुढेही मोठे आव्हान आहे.

अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या सहकार्याने स्वतंत्र पॅनल केले. यावेळी त्यांच्याबरोबर पुरंदरचे भाजपचे माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे, शरद पवार गटाचे नेते माणिकराव झेंडे, कार्यक्षेत्रातील संचालक आहेत. जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात तगडे आव्हान उभे केले तरी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. जगताप यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाने त्यांना रोखण्यासाठी रणनिती आखली आहे. जगताप यांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी नाराजी व्यक्त केली. युगेंद्र पवार यांनीही टोला लगावला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून जगताप टार्गेटवर आहेत. कारखान्याच्या मुरुम-वाल्हा गटात तिरंगी लढत होत आहे. तेथून बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप निवडणूक लढवत आहेत. येथील लढत हायव्होल्टेज ठरेल. अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here