पुणे : जिल्ह्यात जोरदार पाऊस, वाळलेल्या पिकांना जीवदान, उसाच्या नव्या लागवडीला गती

पुणे: सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात मागील तीन दिवस वादळ-वाऱ्याशिवाय समाधानकारक मुरपाऊस सुरू आहे. यामुळे उसासह फळभाज्या, भाजीपाला या पिकांना फायदा झाला आहे. तसेच नव्याने केलेल्या ऊस लागवडींनाही फायदा होणार आहे. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. वाळून गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखााना व माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवड हंगाम सुरू असून नव्या लागवडींनाही बूस्टर डोस मिळाला आहे.

यंदा मे-जून कोरडे गेल्याने शेतकरी धास्तावले होते. नीरा डावा कालवा मेअखेर आटल्याने बागाईत क्षेत्रातील ऊस पीक धोक्यात आले होते. सोमेश्वर व माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती व पुरंदर तालुक्यातील जिराईत गावांतील उभा ऊस, खोडवा वाळू लागला होता. आता पिकाला पावसाने जीवदान मिळाले आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना पावसाचा आणि धरणाचा अंदाजच लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या. अनेकांनी मशागती करून ठेवलेल्या आहेत. पाऊस थांबताच उशिरा उगवणारे सोयाबीन, बाजरीच्या वाणाची पेरणी करणार आहोत असे काही शेतकऱ्यांनी साांगितले. पाऊस थांबल्यानंतर सोयाबीन, बाजरी, उडीद, तूर अशा पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांना करता येणार आहेत. त्यामुळे कृषी व्यावसायिक दुकानदारांमध्येही उत्साह पसरला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here