पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे यांची नियुक्ती

पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या संचालक मंडळाने कार्यकारी संचालक, कार्यालयाने अधीक्षक, ऊस विकास अधिकारी व वित्त विभागप्रमुख आदी रिक्त जागा भरण्यासाठी यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये कार्यकारी संचालकपदी (एमडी) जितेंद्र रणवरे यांची नियुक्ती करण्यात आली. रणवरे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सहकारी साखर कारखानदारीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज (माळशिरस), विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना अशा विविध साखर कारखान्यांमध्ये काम केले आहे.

दरम्यान, कारखान्याच्या इतर पदभरती प्रक्रियेत कार्यालयीन अधीक्षकपदी अनिल पांडुरंग तावरे, वित्त विभाग प्रमुखपदी रणजित घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तर ऊस विकास अधिकारी हे पद अद्याप रिक्त राहिले असल्याची माहिती कारखान्याचे मावळते प्रभारी कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी दिली. नूतन कार्यकारी संचालक रणवरे यांनी साखर उद्योगातील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनाला गती द्यावी लागेल. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढविणे, आर्थिक नियोजन करणे, साखर उत्पादनाबरोबर ऊर्जा व्यवस्थापन, उपपदार्थांची विक्री, शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी आणि संचालक मंडळाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींच्या अनुषंगाने त्यांना काम करावे लागणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here