पुणे : माळेगाव कारखान्याकडून ३३०० रुपये दरानुसार ऊस बिले अदा – अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री

पुणे : माळेगाव सरकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये सभासदांचे ७,२०,१८९. ८८७ टन आणि कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांचे १३,९९४.७०० टन तसेच गेटकेन ऊस पुरवठादारकांचे ३,५५,४९९.२६७ टन ऊसाचे एफआरपीपेक्षा जास्त पैसे अदा केले आहेत. कारखान्याने हंगामात १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले होते. परंतु एकरी उत्पादनात घट झाली. त्यामुळे १२५ दिवसांत, दि. ६ मार्चअखेर १०,८९,६८३.८५४ टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. एफआरपीनुसार ३,२७० रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस बिले देण्याऐवजी ३३०० रुपये टन याप्रमाणे देण्यात आली आहेत. कारखान्याचे अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली.

कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार, व्हाईस चेअरमन संगीता कोकरे संचालक मंडळ आदींच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार, तोडणी मजुरांच्या सहकार्याने कारखान्याचा गळीत हंगाम पार पडला असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले. कारखान्याने दि. ५ फेब्रुवारीनंतर गाळपास आलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन उसास १०० रुपये अधिकचे (रुपये ३४००) पेमेंट अदा केले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कारखान्याने बी हेवी डायव्हर्जनसह सरासरी १२.२८३ टक्के उताऱ्याने १२,७७,१०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने ८,८९,७७,३०० युनिटची वीज निर्मिती करून अंतर्गत वापर ३,६७,७८,७४० युनिट झाला आहे. महावितरण कंपनीला ५,२१,९८,५६० युनिट वीज निर्यात केलेली आहे. डिस्टीलरी विभागामध्ये ९३,८१,४१६ लिटर्स स्पिरीट व ७६,२३,७८० लिटर्स इथेनॉल उत्पादन घेतले असल्याचे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here