पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची निवड

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे यांची रविवारी निवड झाली.दिवंगत उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील, असे जाहीर केले होते. त्यानुसार संगिता बाळासाहेब कोकरे यांनी मुदत पूर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत नितीन शेंडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने शेंडे यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. या निवडीसाठी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, दत्तात्रेय येळे, गणपत खलाटे, अविनाश देवकाते, विजय तावरे, शिवराज जाधवराव, विशाल जगताप, प्रताप आटोळे, रतनकुमार भोसले, शेखर जगताप तसेच कार्यकारी संचालक पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here