सांगली : महांकाली कारखान्यासाठी शेतकरी विकास पॅनेल व कारखाना बचाव कृती समितीमध्ये चुरशीचा सामना

सांगली : महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. सत्ताधारी महांकाली शेतकरी विकास पॅनेल आणि महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून पुनरुज्जीवनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडला जात आहे. दुसरीकडे संदीप आबा गिड्डे-पाटील, जयसिंगराव शेंडगे, गरज मिलिंद कोरे आणि गजानन कोठावळे यांच्या नेतृत्वाखालील बचाव कृती समितीने परिवर्तनाचा मुद्दा पुढे आणला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांची भूमिका स्पष्ट नसल्याने कारखाना निवडणुकीतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळणार, याची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोणता गट सभासदांना अधिक प्रभावीपणे आपल्या बाजूने वळवतो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनी अद्याप निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या तीन प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही पॅनेलमधील सामना दिवसेंदिवस चुरशीचा होत आहे. दोन्ही गटांनी सभासद मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. मात्र, तालुक्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका स्वीकारली आहे. काही प्रमुख राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दोन्ही गटांच्या प्रचारात सक्रिय दिसत आहेत. त्यांच्या पाठिंब्याबाबत विविध तर्क-वितर्काना उधाण आले असले तरी प्रत्यक्षात बड्या नेत्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here