सांगली : राज्यातील काही साखर कारखानदारांकडून ऊस वाहतुकदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर – गुन्हे दाखल करण्याची मागणी

सांगली: राज्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस वाहतूकदार आणि तोडणी मजुरांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विविध बँकांमधून कर्जे उचलण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने केला आहे. ही कर्जे वेळेत न फेडल्यामुळे अनेक ऊस वाहतूकदारांचे सिव्हिल स्कोअर खराब झाले असून, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी आठ दिवसांत कारवाई न झाल्यास संघटनेचे पदाधिकारी व राज्याध्यक्ष राजू पाटील हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष राजगोंडा पाटील पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षकांना निवेदन दिले. या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक साखर कारखाने ऊस वाहतूक आणि तोडणी हंगामासाठी वाहतूकदारांकडून वाहनांची आरसी पुस्तके, ७/१२ उतारे, कोरे धनादेश, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतात. या कागदपत्रांचा गैरवापर करून काही कारखानदारांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाहतूकदारांच्या नावावर हार्वेस्टिंग, ट्रान्स्पोर्टिंग तसेच मुद्रा कर्जे उचलली आहेत. त्यांची परतफेड न झाल्याने आता अडचणी निर्माण झाले आहेत. दुसऱ्याच्या नावावर कर्जे उचलणे हा गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आंदोलन केले जाईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here