सांगली : एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवण्याचे आमदार जयंत पाटील यांचे आवाहन

सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) तंत्रज्ञानाचा वापर करीत ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी केले. माणिकवाडी येथे वाटेगाव संयुक्त सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून ३७ पाणीपुरवठा संस्था उभा करून वाळवा तालुका हिरवगार केला आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या ३०-३५ वर्षापूर्वी उभारलेल्या पाणीपुरवठा संस्था परिसराच्या विकासाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार जयंत पाटील यांनी भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन काटकसर आणि पारदर्शी कारभार करीत पाणी संस्था चालवाव्यात, असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राजारामबापू कारखान्याच्या जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीप कुमार पाटील, कारखान्याचे संचालक अतुल पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक संजय शिंदे, हरिश्चंद्र औताडे, राजारामबापू बँकेचे संचालक नामदेव मोहिते, संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर, उपाध्यक्ष राजाराम यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here