सातारा : कृष्णा कारखान्यासाठी १२५ अर्जांची विक्री, आज दोन्ही पॅनलकडून अर्ज दाखलची शक्यता

सातारा: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी गुरुपुष्यामृतयोग असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याचे संकेत आहेत. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेलही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत १२५ अर्जांची विक्री झाली आहे. तर एक अर्ज दाखल झाला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार ही अंतिम मुदत आहे.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्याची अंमलबजावणी उपनिबंधक कार्यालयातून केली जात आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केल्याचे सांगण्यात आले. अर्ज दाखल करण्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी शांतता होती. दुपारी तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, इच्छुक उमेदवारांकडून अर्जाची खरेदी करण्याचा वेग वाढल्याचे सांगण्यात आहे. कालच्या तिसऱ्या दिवशी ४३ अर्जाची विक्री झाली. आजअखेर १२५ अर्जाची विक्री झाल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. आता अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पॅनलनी गुरुपुष्यामृत मुहूर्त साधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel

अर्जांसाठी उरली दोन दिवसांची मुदत, पॅनेल निवडण्यासाठी नेत्यांची कसोटी

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसााठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यासाठी दोनच दिवसांचा अवधी राहिला आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि विरोधक संस्थापक पॅनेलकडून उमेदवारांची नावे निश्चित करताना दमछाक होताना दिसत आहे. बंडखोरी, नाराजी नाट्याची ठिणगी रोखण्यासाठी आघाड्यांसह त्यांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. निवडणुकीसाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये गटातून डझनभर इच्छुकांचा शड्ड आहे. अंतर्गत नाराजी कशी रोखायची, हा प्रश्न दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांना सतावत आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही आघाड्यांमधील धुसफूस अशीच कायम राहणार आहे. मात्र, जी आघाडी नाराजी दूर करून बंडखोरांना शांत ठेवण्यात यशस्वी होईल, त्यांचे विजयाचे पारडे जड होईल, अशी स्थिती आहे. कारखान्याच्या राजकारणात भावकी फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. उमेदवारी देताना जर एका भावकीला झुकते माप दिले, तर दुसरी मोठी भावकी थेट विरोधात जाताना दिसते. त्यामुळे दोन्ही पॅनेलकडून त्याचा मध्य सांधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. उमेदवारामागे सामाजिक आणि कौटुंबिक समीकरणे किती मजबूत आहेत, हे तपासले जात आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here