सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ५१ अर्ज दाखल झालेत. एकूण १३९ अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल अर्जाची छाननी सोमवारी (ता. २५) होणार आहे, असेही श्रीमती यादव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व त्यांच्या गटातील एकाही समर्थकाने निवडणुकीसाठी अर्ज भरलेला नाही. १९८९ पासून मोहिते गट आणि कृष्णा कारखाना निवडणूक असे समीकरण होते. मग यावर्षी मोहिते गट निवडणुकीपासून लांब आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.
कारखाना निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यातून सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचेही स्पष्ट झाले. रेठरे हरणाक्ष गटातून सर्वाधिक आठ अर्ज आज दाखल झाले, तर गट क्रमांक एक वडगाव हवेली दुशेरेमधून सात, दोन काले कार्वेतून सहा, तीन नेलें तांबवेतून सात, चार रेठरे हरणाक्ष बोरगावातून आठ, पाच येडेमच्छिंद्रतून सात, सहा रेठरे बुद्रुकमधून सहा अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राखीव प्रवर्गातील अर्जाची पहिली छाननी होईल. त्यानंतर सर्वसाधारण ऊस उत्पादक सभासद मतदार संघांतील अर्जाची छाननी गट क्रमांकानुसार होईल. छाननीसाठी उमेदवार, सूचकापैकी एकास उपस्थित राहता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी दिली. जाती- भटक्या जमाती विमाव गटातून प्रत्येकी तीन, तर ओबीसी व अनुसूचित जाती जमाती गटातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल आहेत.


















