सातारा : ‘कृष्णा’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ‘बॉयलर इंडिया’ राष्ट्रीय प्रदर्शनात कारखाना सन्मानित

सातारा : शिवनगर (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. नवी मुंबई येथे पार पडलेल्या ‘बॉयलर इंडिया एक्स्पो’मध्ये कारखान्याला शुगर श्रेणीत ‘बेस्ट बॉयलर युझर्स’ मध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

औद्योगिक सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर आणि उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापन या निकषांवर कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ. यांच्या कुशल कारखान्याने सुरेश भोसले मार्गदर्शनाखाली यापूर्वी तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर उच्च तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि डिस्टिलरीच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी नामांकित संस्थांचे प्रतिष्ठित पुरस्कार कारखान्याला प्राप्त झाले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here