सातारा: जरंडेश्वर कारखाना गाळपात तर अजिंक्यतारा साखर उताऱ्यात अव्वल

सातारा: जिल्ह्यातील सर्व 17 साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम पूर्ण झाला असून, एकूण एक कोटी 8 लाख 49 हजार 991 टन उसाचे गाळप करण्यात आले. यामधून एक कोटी 7 लाख 57 हजार 30 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी 9.31 टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या हंगामात जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक 19 लाख 15 हजार 166 टन गाळप करत 16 लाख 35 हजार 100 क्विंटल साखर उत्पादन करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. तर अजिंक्यतारा साखर कारखान्याने 12.66 टक्के साखर उतारा मिळवत आघाडी घेतली.

जिल्ह्यातील नऊ सहकारी आणि आठ खासगी साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. खासगी कारखान्यांनी 59 लाख 90 हजार 913 टन उसाचे गाळप करून 52 लाख 32 हजार 615 क्विंटल साखर उत्पादन केले, मात्र त्यांचा सरासरी साखर उतारा 8.73 टक्के राहिला.याउलट सहकारी साखर कारखान्यांनी 48 लाख 59 हजार 78 टन गाळप करून 55 लाख 24 हजार 415 क्विंटल साखर उत्पादन केले. त्यांचा सरासरी साखर उतारा 11.37 टक्के राहिला, ज्यामुळे कमी गाळप करूनही अधिक साखरनिर्मिती करण्यात त्यांना यश आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here