सातारा : सवादे (ता. कराड) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित सभासद शेतकऱ्यांचा संवाद मेळाव्यात साळशिरंबे ग्रामस्थांच्यावतीने आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. आमदार भोसले हे वाकुर्डे जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिल भरून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील येळगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी वाकुर्डे जलसिंचन योजना सौरउर्जेवर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. कराड दक्षिण मतदारसंघात पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची व्याप्ती वाढवण्यासाठी कृष्णा बँक आणि सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेमार्फत कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. घर तिथे सौरऊर्जा या योजनेअंतर्गत कराड दक्षिणमध्ये ग्रामस्थांना अर्थपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेबद्दलही ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले. विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विक्रम राऊत, जयवंत पाटील, जयवंत यादव, आबासो शेंडगे, धनाजी साठे, शरद साळुंखे, गणेश साठे, गौरव चोपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


















