सातारा : कृष्णा कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल, ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित

सातारा : केंद्र शासनाचा प्रदूषण रोखण्याचा मानस आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याने ई. व्ही. चार्जिंग स्टेशन उभारले आहे. इलेक्ट्रिक वाहन ऊर्जेमुळे धूर आणि कार्बन उत्सर्जन कमी होते, त्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखान्यातर्फे संचलित नवीन ई. व्ही. चार्जिंग स्टेशन व एम. पी. डी. डिझेल, पेट्रोल पंपाचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. कारखान्याच्यावतीने सीएनजी स्टेशनची सुविधा यापूर्वीच दिली असल्याने याचा निश्चितपणे फायदा परिसरातील सर्व वाहनधारकांना होईल. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी संचालक संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलास भंडारे, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here