सातारा : थकीत ऊस बिलांप्रश्नी साखर कारखानदारांच्या घरासमोर वसुली आंदोलनाचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

सातारा : जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी कायद्यानुसार ठराविक काळात बिल देणे बंधनकारक असतानाही जाणीवपूर्वक विलंब केला आहे. गळीत हंगाम मार्चअखेर संपला. मात्र साखर कारखानदारांनी ऊस बिले दिलेली नाहीत. येत्या आठ दिवसांत थकीत ऊस बिल पंधरा टक्के व्याजासह न दिल्यास कारखानदारांच्या घरासमोर बेमुदत वसुली आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, साखर कारखान्यांकडून कायद्याचे उल्लंघन होत असूनही जिल्हा प्रशासन केवळ पगार घेण्यापुरते उरले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय कार्यालयांतही बेमुदत मुक्काम ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी कारखानदार आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांकडे बँकेचे हप्ते भरण्यासाठी, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य किंवा दैनंदिन गरजांसाठीही पैसे नाहीत. शेतकरी कर्जबाजारी आणि हतबल झाला आहे अशी व्यथा संघटनेने मांडली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here