सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या स्टोअर रूममध्ये चोरी, दीड लाखाचे साहित्य लंपास

सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअर रूमचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ५४ हजार ७२३ रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व लोखंडाचे साहित्य चोरले. बुधवारी पहाटे सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक रावसाहेब भगवान घोलप (सध्या रा. विद्यानगर, कऱ्हाड, मूळ रा. घोलपवाडी) यांनी फिर्यादी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षक घोलप हे दि. २४ जून रोजी ड्यूटीवर आले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर रात्रीच्या सुमारास स्टोअरचे कुलूप तुटल्याचे समजले. त्याची पाहणी करण्यासाठी ते गेले असता पत्र्याच्या स्टोअररूमचे शटर व कुलूप चेपलेले दिसले. आत पाहणी केली असता काही साहित्य लंपास झाल्याचे दिसले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन अज्ञात व्यक्ती स्टोअर रूममधील कॉपर पाइप व लोखंड असा मिळून सुमारे एक लाख ५४ हजार ७२३ रुपये किमतीचे साहित्य चोरताना दिसले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here