सोलापूर : दामाजी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून १०० कोटी मंजूर

सोलापूर : आर्थिक संकटात सापडलेल्या मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास एनसीडीसीकडून १०० कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. एनसीडीसी कर्ज मंजुरीमध्ये समाविष्ट असणारा सोलापूर जिल्ह्यामध्ये संत दामाजी कारखाना हा एकमेव कारखाना आहे. या कर्ज मंजुरीमुळे दामाजी कारखान्यास नवसंजीवनी मिळणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

कर्ज मंजूर करून आणल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा दामाजी कारखाना संचालक मंडळाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here