सोलापूर : मोलॅसेस पुरवठ्यास टाळाटाळ करून चेन्नईच्या कंपनीची १५.७२ कोटींची फसवणूक, गोकुळ शुगरच्या चौघांवर गुन्हा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने चेन्नई येथील इआयडी पॅरी इंडीया लि. कंपनीस बी हेवी मोलॅसेस व सी मोलॅसेस देण्याचा करार केला. गोकुळ शुगरमध्ये तयार होणारा बी हेवी मॉलेसेस प्रति टन ११ हजार ५०० तर सी मॉलेसेस ९ हजार ५०० रुपये दराने घेण्याचा करार चेन्नई येथील कंपनीशी करण्यात आला होता. माल वाहतूकदार आशिष पारेख यांच्या ओळखीने हा व्यवहार झाला होता. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ यांदरम्यान माल पुरवठा करण्यात येणार होता. मात्र, मोलॅसेस पुरवठा न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे. आपला साखर कारखाना दिवाळखोरीत असताना ते लपवून करार करुन फसवणूक केली. एकूण १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता याप्रकरणी गोकुळ शुगरचे गणेश दत्ता शिंदे, विशाल गणपत शिंदे (संचालक), दत्ता बलभीम शिंदे (मॅनेजिंग डायरेक्टर), कपील बलभीम शिंदे (सीएफओ) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजगोपाल श्रीनिवासन रामस्वामी (वय ५१, रा. रामनगर, काचीपुरम, तामिळनाडू) यांनी फिर्याद दिली आहे. गोकुळ शुगरने बी हेवी मॉलेसेस (मळी) आणि सी मॉलासेस चेन्नई येथील इआयडी पॅरी इंडीया लि. कंपनीस देण्याचा करार केला. त्यापोटी कारखान्याने कंपनीकडून १५ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्यानुसार कंपनीला मोलॅसेस पुरवठा केलेला नाही. कंपनीने सुरुवातीला ९ कोटी २० लाख रुपये तर नंतर ६ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही गोकुळ शुगरने मॉलेसेसचा पुरवठा केला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here