सोलापूर : गोकुळ शुगरकडून ५ जूनपर्यंत थकीत ऊस बिले देण्यासाठी हालचाली, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

सोलापूर : ऊस उत्पादक शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून ऊस पुरवठा शेतकरी ऊस बिलाच्या रकमेसाठी सोलापुरात बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहेत. ऊस उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने तुळजापूर उमरगा निलंगा अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस पुरवठादार शेतकरी गोकुळ शुगरच्या ऊस बिलासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहेत. साखर आयुक्तांनी गोकुळ शुगरच्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी आरआरसी कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यादरम्यान, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी थकीत ऊस बिलासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम ५ जूनपर्यंत देणार असल्याचे काही राजकीय नेत्यांना फोनवरून बोलताना सांगितले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आणि दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांनी चेअरमन दत्ता शिंदे यांच्याशी यापूर्वी संपर्क साधला होता. मात्र, सध्या आर्थिक अडचण असून, तातडीने शेतकऱ्यांच्या रकमा देणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने आंदोलन शेतकरी आणखी संभ्रमात पडले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्यावर कारखान्यावर आरआरसी कारवाईची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार जमदाडे यांनी शेतकऱ्यांना लेखी पत्र दिले. कारवाईसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. पहिली नोटीस गोकुळ शुगरला बजावली आहे असे त्यांनी सांगितले. तर ऊस बिलासाठी पूनम गेट समोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या दोन शेतकऱ्यांना शनिवारी भोवळ आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here