सोलापूर : मोहिते-पाटील साखर कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल, कार्यस्थळावर वृक्षारोपण उपक्रम

सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील, चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन आवश्यक असल्याचे अधोरेखित करत कारखाना व कामगार कॉलनी परिसरात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

कारखाना कार्यस्थळावरील या कार्यक्रमात वृक्षसंगोपन आणि संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमीडिया लेझर शो समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सेक्रेटरी अनिल काटे, वाय. बी. इनामदार, आर. एस. चव्हाण, एस.ए. शेखर, बी.व्ही. सावंत, डॉ. एस.जे. नरसाळे, पी. एच. इनामदार, एस. एम. साळुंखे, आर.एस. गायकवाड, बी.आर. इनामदार, जयवंत माने-देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here