वैक्सीन च्या डोसबाबत अजूनही अनभिज्ञ, काही डेव्हलपर्सच्या संपर्कात भारत: पंतप्रधान नरेंद्र मोदी

104

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या वर्च्युअल बैठकीमध्ये सांगितले की, कोरोना संक्रमणामुळे होणारे मृत्यू आणि रिकवरी च्या बाबत भारत दुसर्‍या देशांच्या तुलनेत चांगल्या अवस्थेत आहे. पीएम मोदी यांनी यासाठी प्रयत्नांना श्रेय दिले आहे. पीएम मोदी यांनी दरम्यान कोरोना वैक्सीन बाबतही अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, कोरोनाबाबतचे अनेक प्रश्‍नांची उत्तरे अजूनही माहिती नाहीत.

पीएम मोदी यांनी सांगितले की, आपल्याला संक्रमण थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. संक्रमण दराला 5 टक्क्यापेक्षा कमी करावे लागेल. आरटीपीसीआर टेंस्ट ची संख्या वाढवावी लागेल. घरांमध्ये क्वारंटाइन रुग्णांची देखभाल वाढवावी लागेल. कम्युनिटी हेल्थ सेंटर्स ला चांगले बनवावे लागेल. आमचे लक्ष्य आहे की, मत्यु दर 1 टक्क्यापेक्षाही खाली यावा. एकही मृत्यु होवू नये. जागरुकता मोहिमेमध्ये कोणतीही कमी येवू नये.

पीएम मोदी यांनी सांगितले की, आज जगामध्ये आणि देशामध्ये वैक्सीन चा काम शेवटच्या टप्प्यात आहे. भारत सरकार प्रत्येक डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवून आहे. आता हे निश्‍चित झालेले नाही की वैक्सीन चा एक डोस घ्यावा लागेल की दोन, किमती किती असावी. आता अनेक प्रश्‍नांची उत्तरे नाहीत. आम्ही भारतीय डेव्हलपर्स आणि मैन्युफैक्चरर्स च्या संपर्कात आहोत. ग्लोबल डेव्हलपर्स आणि इंटरनॅशनल कंपनीच बरोबर जितका संपर्क बनवू शकतो त्याबाबत व्यवस्था तयार केली आहे.

मोदी म्हणाले, कोरोना विरांधात लढाईमध्ये सुरुवातीपासूनच आम्ही एक एक नागरीकाचा जिव वाचवण्यावर अधिक भर दिला आहे. कोरोनाचे टीकाकरणाचे अभियान मोठ्या प्रमाणात चालेल. यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागेल. वैक्सीबाबत भारताचा अनुभव दुसर्‍या देशांपेक्षा अधिक आहे. जगामध्ये अनेक औषधे वर्षांपासून प्रचलित असूनही त्याचे साइड इफेक्ट आहेत. भारत जो वैक्सीन नागरीकांना देईल ते वैज्ञानिकांच्या मतानुसार सर्व कसोटीवर उतरेल.
मोदी म्हणाले की, आम्हाला किती कोल्ड स्टोअरेजची आवश्यकता आहे, याबाबत राज्य सरकारला तयारी सुरु करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने राज्यांना आग्रह केला होता की, राज्य लेवलवर स्टीयरींग कमिटी आणि टास्क फोर्स चे गठन केले जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here