उच्च इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्दमुळे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी

मुंबई : केंद्र सरकारने उच्च इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) रद्द केल्यानंतर गुरुवारी साखर उद्योगाशी निगडीत शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. 11 जून रोजी साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3.5% पर्यंत वाढ नोंदवण्यात आली. सरकारी अधिसूचनेनुसार, 22% ते 30% इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलवर आता उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे साखर उद्योग आणि इथेनॉल उत्पादनाशी संबंधित कंपन्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळी 9:31 वाजेपर्यंत धामपूर शुगर मिल्स आणि द्वारिकेश शुगर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. धामपूर शुगरचा शेअर 3.5% तर द्वारिकेश शुगरचा शेअर 2.7% ने वधारला.याशिवाय बलरामपूर चिनी मिल्स, बजाज हिंदुस्तान शुगर आणि डालमिया भारत शुगर यांच्या शेअर्समध्येही 1.5% ते 2% पर्यंत वाढ दिसून आली.

ChiniMandi WhatsApp Channel

भारताने डिसेंबरमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण केले होते. त्यानंतर सरकारने E20 पेक्षा जास्त इथेनॉल असलेल्या इंधनांसाठी नवीन तांत्रिक मानके लागू केली आहेत. मे महिन्यात सरकारने E22, E25, E27 आणि E30 इंधनांसाठी भारतीय मानके जाहीर केली होती. नव्या अधिसूचनेनुसार या इंधनांना अतिरिक्त उत्पादन शुल्क तसेच रस्ता आणि पायाभूत सुविधा उपकरातूनही सूट देण्यात आली आहे.

पश्चिम आशियातील संघर्ष आणि जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील संभाव्य अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होईल आणि आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास हातभार लागेल.तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे साखर उद्योग, इथेनॉल उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here