सध्या साखर कारखाने बनले राजकीय अड्डे : माजी आमदार राजन पाटील

सोलापूर : आजकाल साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनू लागले आहेत. एखादा कारखाना बंद पडला तर त्यावर आधारित २५ हजार कुटुंबाला झळ पोहोचते. त्यामुळेच युवकांनी राजकारण्यांचा आदर्श घेण्यापेक्षा, पुढची पिढी सुसंस्कृत निर्माण करण्यासाठी अशा कर्तृत्ववान, पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा आदर्श घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आ. राजन पाटील यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार राम सातपुते, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, कमलाभवानी शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे, भोसे सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील, सरपंच अॅड. गणेश पाटील, बाळासाहेब माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

माजी आमदार राम सातपुते म्हणाले की, गणेश पाटील यांनी पराभव विसरून जोमाने पुढे गेले पाहिजे. गणेश पाटलांचे वकीलपत्र आता रामभाऊ सातपुते यांनी घेतले आहे, त्यामुळे भविष्यात गणेश पाटील हे निश्चित चांगल्या पदावर जातील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. बालाजी कोरके, शेखर कोरके, समाधान खारे, भास्कर कोरके, तानाजी भिंगारे, स्वप्निल तळेकर, सुभाष जमदाडे, संतोष काकडे, आबासाहेब कोरके, सारंग कुलकर्णी, कपिल कोरके, रोहित सुरवसे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here