आता साखरेची एमएसपी ४५०० रुपये करण्याची साखर उद्योगाची मागणी

पुणे : केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत गेल्या वर्षापेक्षा शंभर रुपयांची वाढ करत १०.२५ टक्के उताऱ्याला ३६५० रुपये (तोडणी-वाहतूक खर्चासह) प्रतिक्विंटल दर केला. एफआरपीत मागील सात वर्षात प्रतिटन नऊशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या सात वर्षात साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये (किमान मूल्य) काहीच वाढ केलेली नाही. साखरेचाही उत्पादन खर्च वाढल्याने साखर उद्योग कोसळण्याच्या बेतात आला आहे. राज्य सरकारने वीजेचे तर केंद्र सरकारने इथेनॉलचे दर वाढवलेले नाहीत. साखरेची निर्यातही होत नाही. त्यामुळे साखर उद्योगाने एमएसपी वाढवण्याची आग्रही मागणी केली आहे. साखरेची एमएसपी ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल करावी, यासाठी साखर उद्योगाने पाठपुरावा कायम ठेवला आहे.

गेली दहा वर्षे साखरेचे दर ३००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. सध्या बहुतांश कारखाने शॉर्ट माजींनमध्ये (अपुरा दुरावा) गेले आहेत. केवळ एमएसपीतील वाढ कारखान्यांना तारू शकते असे साखर उद्योगाचे मत आहे. याबाबत सोमेश्वर कारखान्याचे संचालक हृषिकेश गायकवाड म्हणाले की, साखरेची एमएसपी जून २०१८ मध्ये २९०० रुपये होती. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये ३१०० रुपये प्रतिक्विंटल झाली. त्यावेळी एफआरपी २७५० रुपये प्रतिटन होती. आता एमएसपीमध्ये मोठी वाढ करण्याची गरज आहे. वृद्धेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीन शिंदे म्हणाले की, कच्च्या मालाची किंमत वाढत आहे आणि त्यापासून जो पक्का माल बनवतोय त्याची किंमतच वाढत नाही. यामुळे व्याजाचा बोजा तीनशे ते सहाशे रुपये प्रतिटनापर्यंत गेला आहे. एमएसपी वाढवली तरच कारखानेही सुदृढ होतील. भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी सांगितले की, साखरेची एमएसपी उत्पादन खर्चाची जोडली जायला हवी. सद्यःस्थितीत साखर उद्योग दोन्ही अडचणीत राहतील. एमएसपी ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल करणे आवश्यक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here