राज्यातील साखर कामगारांचा विविध मागण्यांसाठी २२ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

कोल्हापूर : सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो पन्नास रुपये करावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगार २२ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. साखरेचा किमान विक्री दर वाढल्यास राज्यातील कारखाने आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येतील. कारखाने सुस्थितीत आले, तर शेतकऱ्यांना चांगले पैसे देता येतील आणि कामगारांचे थकीत पगारही देता येतील. त्यामुळे सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी साखर कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

साखर कामगार संघटनेच्या नेत्यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना या संदर्भातील मागण्यांचे निवेदन पाठवले आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत सरकारने २० तारखेपर्यंत योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा २२ तारखेपासून राज्यातील हजारो साखर कामगार बेमुदत संपावर जातील.

ChiniMandi WhatsApp Channel

सरकारने आमची भूमिका समजून घेऊन निर्णय घ्यावा. दुष्काळाच्या बाबतीत यापूर्वी आम्हालाही अनेक अनुभव आले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी सरकार आणि कारखानदारांना सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबत कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. परंतु सरकारने या विषयात लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here