दहा वर्षानंतर पहिल्यांदाच देशात साखर आयात होणार, दहा लाख टन आयातीस परवानगी

मुंबई : बाजारात मागील दोन महिन्यांत साखरेच्या भावात तब्बल ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. आता आगामी काळ सणासुदीचा आहे. या काळात साखरेला मोठी मागणी असते. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरातील वाढ टाळण्यासाठी केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत दहा लाख टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारत जवळपास दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच साखरेची आयात करणार आहे. कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून पांढऱ्या साखरेची निर्मिती करण्याची क्षमता असणाऱ्या कारखान्यांनी शून्य शुल्काने आयातीसाठी २१ ते २८ ऑगस्टदरम्यान अर्ज करावेत,’ असे सरकारने साखर आयातीच्या अधिसूचनेत म्हटले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत आयात पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या आयातदारांना प्राधान्य दिले जाईल, असे सरकारचे धोरण असल्याचे वृत्त रॉयटर्सने वृत्तसंस्थेने दिले आहे.

देशात साखरेचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला. भारतात बंदरांजवळ काही साखर कारखाने आहेत. हे कारखाने शुल्कमुक्त कच्ची साखर आयात करून त्यावर प्रक्रिया करतात आणि त्यापासून तयार झालेली पांढरी साखर निर्यात करतात. केंद्र सरकारने या कारखानदारांना १० लाख टनांच्या आयात कोट्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखान्यांना यापूर्वी आयात केलेल्या कच्च्या साखरेपासून तयार केलेली रिफाइंड साखर ऑक्टोबर अखेरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकता येईल. त्यामुळे बाजारात लगेच तीन लाख टन साखर उपलब्ध होईल. भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात लगेच चार टक्क्यांची वाढ झाली आहे. लंडनमध्ये पांढऱ्या साखरेच्या आणि न्यूयॉर्कच्या वायदे बाजारात कच्च्या साखरेच्या दरामध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. साखर दरवाढीबाबत बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, ‘भारत साखर आयात करणार’ या वृत्ताने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढले आहेत. असे असले तरी देशातील दरवाढीला आयातीमुळे लगाम बसेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here