ऊस बिलप्रश्नी शेतकऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

मुझफ्फरनगर : थकीत ऊस बिलांप्रश्नी आंदोलन जन कल्याण संघटनेचे संयोजक प्रमोद कुमार बलियान यांची जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांच्या कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीत प्रमोद कुमार यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना सांगितले की, एक ऑक्टोबर रोजी त्यांनी लोक भवनमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीवेळी थकीत ऊस बिलाचा मुद्दा मांडला होता. यामध्ये भैसाना साखर कारखान्याचा समावेश होता. प्रमोद कुमार यांनी बैठकीला उपस्थित भैसाना साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक देवेंद्र सिंह यांना विचारले की, आमच्या कारखान्याला सीसी लिमिट नसल्याचे प्रशासन शेतकऱ्यांना सांगत आहे. त्याचा काय अर्थ शेतकऱ्यांनी घ्यायचा? याचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे का ? दुसरे साखर कारखाने ३५ ते ४० कोटी सीसी लिमिटवर व्याज देत आहेत. कारखाना प्रशासनाच्या अपयशाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या हंगामातील ऊस बिले त्वरीत दिली नाहीत तर शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा त्यांनी यावेळी ऊस विभागाच्या महा व्यवस्थापकांना दिला. या वेळी साखर कारखान्याचे अधिकारी, खतौलीच्या त्रिवेणी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक कुमार, मन्सूरपूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित, ऊस विभागाचे सरव्यवस्थापक बलधारी सिंह, टिकौला कारखान्याचे सर व्यवस्थापक सईम अन्सारी, खाईखेडी कारखान्याचे सरव्यवस्थापक संजीव कुमार, बबीता राठी, जियाऊर रहमान आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here