उसाला पहिली उचल प्रतिटन ३६०० रुपये मिळू शकते : शेतकरी नेते संजय कोले

सांगली : राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटकातील रयत संघटनांनी प्रतिटन ५५०० रुपये दर, पहिली उचल ४५०० रुपये आणि ५०० रुपये अनुदानाची मागणी केली आहे. साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल ५००० रुपये करण्याचीही मागणी आहे. तर ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिटन ७५०० रुपये दराची मागणी केली आहे. याबाबत ‘डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार साखर व उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे ऊसदराचे गणित मांडले जाते. संघटनेने तोडणी व वाहतूक खर्च प्रतिटन ८७५ रुपये गृहीत धरला आहे. या गणितानुसार पहिली उचल ३६०० रुपये मिळू शकते,’ असे शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले यांनी सांगितले.

संजय कोले म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊसदराच्या मागण्यांमागील राजकारणासोबत आर्थिक गणितही समजून घ्यावे. चालू २०२६-२७ च्या गळीत हंगामात ७५-२५ फॉर्म्युल्यानुसार तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता उसाची पहिली उचल प्रतिटन ३६०० रुपये देणे शक्य आहे. साडेबारा टक्के साखर उतारा असलेल्या उसाला सर्व खर्च वजा जाता प्रतिटन ३९०० ते ४००० रुपये मिळावेत अशी संघटनेची मागणी आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिटन १००० रुपये अनुदान आणि साखरेचा किमान विक्री दर ४७५० रुपये करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. विविध मागण्या आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आर्थिक गणिताचा विचार करावा,’ असे कोले यांनी म्हटले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here