नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियावर वेगाने ‘व्हायरल’ झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमत वाढीचे वृत्त फेटाळून लावले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, असा कोणताही आदेश मंत्रालयाने जारी केलेला नाही.‘पीआयबी’च्या तथ्य तपासणी विभागानुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दस्तऐवजात खोटा दावा करण्यात आला होता की पेट्रोलच्या किमती 10 रुपये आणि डिझेलच्या किमती 12.50 रुपये प्रति लीटरने वाढवण्यात आल्या आहेत.
सरकारने अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हा आदेश बनावट असून भारत सरकारने असा कोणताही आदेश काढलेला असे सांगत ‘पीआयबी’ने नागरिकांना या खोट्या दाव्यावर विश्वास न ठेवण्याचे आणि तो पुढे न पाठवण्याचे आवाहन केले. हे स्पष्टीकरण अशा वेळी आले आहे जेव्हा हा व्हायरल संदेश सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर वेगाने पसरत होता. केंद्र सरकारने सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींशी संबंधित कोणताही अधिकृत निर्णय केवळ अधिकृत आणि सत्यापित माध्यमांद्वारेच जाहीर केला जातो.

















