केंद्र सरकारने साखरेचा दर प्रति क्विंटल ४३०० रुपये करावा, साखर उद्योगाला दिलासा द्यावा : मानसिंगराव नाईक

सांगली : केंद्राने साखरेचे दर प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रुपये करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपासून इथेनॉलचे दर स्थिर आहेत. त्यात केंद्राने वाढ करावी, अशी मागणी विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात रोलर पूजनप्रसंगी बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.नाईक म्हणाले, साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. एफआरपी दरात सातत्याने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळाला पाहिजे याबाबत दुमत नाही, कारखान्यांचे अर्थकारण सांभाळणेही महत्त्वाचे आहे. ऊस खरेदीचा दर वाढत आला आहे त्या तुलनेत साखर विक्री दरात मात्र वाढ झाली नाही. केंद्राने साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रुपये करावा, तरच कारखाने टिकतील.

ते म्हणाले, इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने दरातही वाढ करणे गरजेचे आहे. दोन-तीन वर्षांपासून इथेनॉल दरात वाढ झाली नाही. उत्पादन खर्च वाढत असताना दर स्थिर राहिल्याने साखर उद्योगावर ताण येत आहे. इथेनॉल दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळासह कारखाना प्रशासन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. २०२६-२७ हंगामासाठी ऊस उत्पादक, सभासदांनी ऊस गळितासाठी पाठवावा. यावेळी संचालक विराज नाईक, सुरेश चव्हाण, शिवाजी पाटील, विरुदेव आमरे, बाबासो पाटील, यशवंत निकम, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, सुहास घोडे-पाटील, डॉ. राजाराम पाटील, संदीप तडाखे तसेच विश्वास पाटील, कोंडिबा चौगुले, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, शंकर गुरव, दत्तात्रय पाटील, टी. एम. साळुंखे, विजय पाटील, विजय देशमुख यांच्यासह खातेप्रमुख, विभाग प्रमुख, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here