महाराष्ट्रात अद्याप १७ कारखान्यांचे गाळप सुरू

168

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात २ मे २०२१ अखेर १७३ साखर कारखाने बंद झाले आहेत. अद्याप १७ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २ मे अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००८.७१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५८.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील सर्व ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. नांदेड विभागातील २५ कारखाने बंद झाले असून पुणे विभागातील २८ कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील १९ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. तर औरंगाबाद विभागातील १७ आणि अमरावती विभागातील २ कारखान्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. नागपूर विभागातही २ कारखाने बंद झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here