धाराशिव : तुळजाई शुगरने २०० रुपयांचा हप्ता न दिल्याने शेतकऱ्यांची कारखान्यावर धडक

धाराशिव : तुळजापूर व बार्शी तालुक्यांतील ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरलेल्या या तुळजाई शुगरने गत हंगामात प्रति टन २७०० रुपये दर जाहीर केला होता. त्यापैकी २५०० रुपयांप्रमाणे बिल जमा करण्यात आले असून, उर्वरित २०० रुपयांचा हप्ता पोळा सणाला देण्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले होते. मात्र, आश्वासन मिळूनही थकीत रक्कम खात्यावर जमा न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट गेट बंद आंदोलन पुकारले. बार्शी तालुक्यातील जवळगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट कारखान्यावर धडक देत कारखान्याच्या मुख्य गेटला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना आत जाण्यापासून रोखले.

जवळगाव येथील शेतकऱ्यांना आठ दिवसांपूर्वी थकीत बिल देण्याचे ठाम आश्वासन देण्यात आले होते. तरीही पैसे खात्यावर जमा न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात जवळगाव (ता. बार्शी) येथील आप्पासाहेब चव्हाण, शुभम वीर, सौदागर कापसे, दीपक गुरव, नागेश कापसे यांच्यासह अन्य ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तामलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि विजय आटोळे यांनी कारखानास्थळी भेट देऊन मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढली.

ChiniMandi WhatsApp Channel

दुपारी १२ च्या सुमारास कारखान्यातील अधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसांत उर्वरित ऊस बिल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर बाहेर थांबलेल्या कामगारांना कारखान्यात प्रवेश मिळाला. तुळजाई शुगरचे चेअरमन अॅड. अनिल काळे यांनी कारखान्याच्या धोरणानुसार प्रति टन २७०० रुपये भाव जाहीर करून २५०० रुपयांप्रमाणे वाटप पूर्ण केले आहे. उर्वरित २०० रुपयांचा हप्ता पोळ्याला देणार आहोत. अत्यंत मोजक्याच शेतकऱ्यांचे पैसे बाकी असून तेही लवकरच खात्यावर जमा करू.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here