गव्हाच्या या प्रजाती शेतकऱ्यांसाठी वरदान, पाऊस आणि गारपीटीतही मिळते चांगले उत्पन्न

भारतातील सर्व प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या गव्हाला पाऊस आणि गारपीटीने मोठा फटका बसतो. त्यामुळे उत्पादन घटते. यातून शेतकऱ्यांसह सरकारसमोर अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान बदल लक्षात घेवून पिके घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तरच देशाला गव्हाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार नाही. अशा स्थितीत काही प्रजाती या पाऊस आणि गारपीटीला तोंड देण्यास सक्षम आहेत.

कृषी जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या गव्हाच्या प्रजातींची गरज आहे. त्यातील कुदरत ८ विश्वनाथ आणि कुदरत विश्वनाथ या दोन प्रजाती शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या आहेत. वाराणसीतील शेतकरी प्रकाश सिंह रघुवंशी यांनी या प्रजाती विकसित केल्या आहेत. कुदरत ८ विश्वनाथ ही प्रजाती ११० दिवसांत पक्व होते. या पिकाची उंची ९० सेमी आणि लांबी २० सेमी असते. याचे उत्पादन प्रती एकर २५ ते ३० क्विंटलपर्यंत मिळते. या गव्हाचा दाणा मोठा आणि चमकदार असतो. कुदरत विश्वनाथ या प्रजातीचा गहू नोव्हेबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणीस उत्तम आहे. थंडी, अतिवृष्टी, गारपीट अशा सर्व नैसर्गिक वातावरणाला ही प्रजाती तोंड देवू शकते. प्रकाश सिंह रघुवंशी हे कुदरत कृषी संशोधन संस्था चालवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here