धाराशिव : धाराशिव तालुक्यातील जागजी येथे पाटील बंधूंनी अवघ्या १० महिन्यांमध्ये एन. व्ही. पी. शुगरची उभारणी केली आहे. अल्पावधीतच नव्याने उभारलेल्या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा रविवारी (दि. २४) मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर आदींसह मान्यवरांच्या हस्ते याची सुरुवात होणार आहे. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कारखानास्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन एनव्हीपी शुगरचे सर्वेसर्वा अप्पासाहेब पाटील, नानासाहेब पाटील व धनंजय पाटील यांनी केले आहे.
गळीत हंगामाला रंगनाथ सावंत, ऊस उत्पादक हनुमंतराव देशमुख, काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, शिवाजी पाटील, अभिजीत मगर, शिवाजी साळुंखे, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले. तुळशीदास जमाले, बाबासाहेब शिंदे, ऊस वाहतूक ठेकेदार काकासाहेब मिसाळ, जहांगीर सय्यद यांच्या हस्ते प्रारंभ होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, हिम्मतराव पाटील, कुलदीप विटेकर, सीए सचिन शिंदे यांची उपस्थिती असेल.