साखरेने भरलेल्या ट्रकचा ताबा सुटून ट्रक दुकानात घुसला

165

सादात (अमरोहा) :धामपूर साखर कारखान्यातून साखर घेवून निघालेलेा ट्रक़ नौगावा सादात मध्ये चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित होवून पिकअप ला टक्कर देत दोन दुकानांमध्ये घुसला. दुर्घटनेमध्ये चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकला. लोकांनी केबिन ला कटर ने कापून चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

रविवारी रात्री जवळपास 10 च्या आसपास नसीरपूर निवासी मनोज कुमार पिकअपमध्ये अमरोहा भाजी मंडईतून कांदे घेवून बिजनौर बाजारात जात होता. पिकअप जेव्हा नौगावा सादात च्या हुसैनी चौकात आला तेव्हा धामपूर च्या साखर कारखान्यातून साखर घेवून अहमदाबाद कडे जाणार्‍या ट्रक ने त्याला टक्कर दिली. यानंतर ट्रक वेल्डिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानामध्ये घुसला. दुर्घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले. टक्कर दिल्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रकच्या केबिनमध्ये राजस्थान च्या भिलवाडा जिल्ह्यातील जसपूर चे निवासी चालक प्रल्हाद अडकले. टक्कर झाल्यानंतर स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली. इन्स्पेक्टर आर पी शर्मा पोलिस अधिकार्‍यांसोबत तिथे पोचले. ट्रक ची केबिन कापून चालकाला बाहेर काढण्यात आले. यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स च्या माध्यमातून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडली. अन्यथा गर्दी असणार्‍या हुसैनी चौकात मोठी दुर्घटना घडली असती. इन्स्पेक्टर आर.पी. शर्मा यांनी ट्रकला ताब्यात घेतले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here